फार्मसी अभ्यासक्रमाच्या ७६० जागा वाढल्या; नवीन १७ महाविद्यालयांना मान्यता

Foto
औरंगाबाद : मागील तीन वर्षार्ंपासून फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. हा कल पाहता अनेक संस्थांनी नव्याने महाविद्यालय सुरू केले. यावर्षी विभागात अनेक संस्थानी नव्याने डी फार्मसी, बी फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिले होते. त्यानुसार यावर्षी डी फार्मसी अभ्यासक्रमाचे नव्याने 17 महाविद्यालयांची भर पडली आहे. त्यामुळे 870 नव्याने यावर्षी जागा वाढल्या आहेत. तसेच जुन्या 70 संस्थामध्ये 4 हजार 688 जागा अशा एकूण 5 हजार 558 जागा यावर्षी डी फार्मसीला भरल्या जाणार आहे. मात्र अर्ज पाहता 18 हजार 63 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहे. नव्याने संस्था वाढल्या असल्या तरी जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अनेकांना फार्मसी अभ्यासक्रम प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे. 

बीफार्मसीच्या वाढल्या जागा
बीफार्मसी अभ्यासक्रमालाही विद्यार्थी प्राधान्य देत आहे. या अभ्यासक्रमातही नव्याने 10 संस्थांची भर पडली असल्याने 760 जागा वाढलेल्या आहे. यावर्षी जुन्या 44 आणि नव्याने 10 अशा एकूण 54 संस्थामध्ये तब्बल 4 हजार 50 जागा भरल्या जाणार आहे. यावर्षी नव्याने 760 जागा वाढल्या आहे. मात्र अर्ज पाहता जागांच्या तुलनेत जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना जागा वाढल्या तरीही प्रवेशापासून वंचित रहावे, लागणार आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker